आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात कार दुचाकीच्या अपघातात पोलिस ठार; आरोपीचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिस जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना ठाण्यातील कल्याण येथे घडली. बबन मुंडे (40) असे मृत पोलिसांचे नाव आहेत. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ड्युटी संपल्याने मुंडे आणि त्यांचा सहकारी दुचाकीवरून घरी जात होते. याच वेळी समोरून भरधाव येणार्‍या कारने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुंडे यांना तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.