आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Sexual Abuse In Trust Raigad, News In Marathi

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; कर्जत तालुक्यातील संतापजनक प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या टाकवे येथील 'चंद्रप्रभा चरिटेबल ट्रस्ट'च्या आश्रमशाळेत मुला-मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित मुलांनी पालकांना आपबिती सांगितल्यानंतर हा घृणास्पद प्रकाराचा भांडाफोड केला. पीडित मुलांच्या आई-वडिलांनी पुणे आणि रायगडच्या चाइल्ड हेल्पलाइनला केली होती. या मुलांच्या वतीने रायगड चाइल्ड हेल्पलाइनने कर्जतच्या पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील `चंद्रप्रभा चॅरिटेबल संस्था` चार ते चौदा वयोगटातल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम करते. संस्थाचालक अजित दाभोलकर आणि मुलांच्या सांभाळ करणार्‍या ललिता तोंडे यांनी इथल्या निरक्षित, गरीब मुला-मुलींना आश्रय देऊन, शिक्षणाचे स्वप्न दाखवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

मुलांचा जाब नोंदवून संस्थाचालक अजित दाभोलकरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, वेठीस ठेवणे, इंटरनेटवरून बदनामी करणे, असे गुन्हे दाखल केले आहेत.