आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Ibrahim,s Hous Mumbke Village In Khed Ratnagiri District

PHOTOS : हे आहे दाऊदचे कोकणातील मूळ घर, ग्रामपंचायत घेणार ताब्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदचे कोकणातील घर आणि इन्‍सेट दाऊद. - Divya Marathi
दाऊदचे कोकणातील घर आणि इन्‍सेट दाऊद.
ठाणे - मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथील मूळ रहिवासी असून, आजही या ठिकाणी दाऊदच्‍या मालकीचे टुमदार घर आहे. परंतु, 15 वर्षांपासून ते बंद असून, मुंबके ग्रामपंचायत त्‍याला ताब्‍यात घेणार आहे. त्‍या दृष्‍टीने शुक्रवारी एक बैठक झाली. परंतु, त्‍यामध्‍ये काही निर्णय होऊ शकला नाही.
दाऊदचे घरावर आहे प्रेम
या घरात दाऊदच्‍या वडिलांचे बालपण गेले. एवढेच नाही तर लहापणी दाऊदसुद्धा येथे नेहमीच येत असे. त्‍यामुळेच आपल्‍या वडिलांच्‍या आठवणी जपण्‍यासाठी त्‍याने लाखो रुपये खर्च करून त्‍याचे नूतणीकरण केले. या घरावर दाऊदचे खूप प्रेम असल्‍याचे येथील ग्रामस्‍थ सांगितात.
पोलिसांनी वाढवली गस्‍त
1993च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद कासकर यांच्या मालकीच्या बहुतांश सर्वच मालमत्तांवर सरकारने टाच आणली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरून दाऊदचे मुंबके येथील राहते घरदेखील 15 वर्षांपूर्वी सरकारने ‘सील’ केले आहे. या इमारतीमध्ये अलीकडेच काही महिन्यांपासून अनोळखी, तसेच संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याने पोलिसांनीही या घराकडे गस्त सुरू केली आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घराचे फोटोज....