आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसच्या डीसीपीची गोळ्या झाडून आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - ठाण्यात एटीएसच्या पोलिस उपायुक्ताने (डीसीपी) आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. स्वतःच्याच पिस्तुलाने गोळ्या झाडून डीसीपी संजय बॅनर्जी यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाणे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बॅनर्जी यांनी शनिवारी दुपारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुले देखील होते.

दुपारी तीनच्या सुमारास डीसीपी बॅनर्जी घोडबंदर रोडवरील गोवा पोर्तूगिजा हॉटेलमध्ये पत्नी व मुलांसोबत गेले होते. तिथेच त्यांचा पत्नीशी काही वाद झाल्यानंतर त्यांनी स्वतःला गोळी झाडून घेतली. त्यांचे मित्र आणि बॅचमेट्स यांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते कौटुंबिक कारणामुळे तणावात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या पत्नीने कामाच्या तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

हॉटेलमधील वेटर आणि ग्राहकांच्या म्हणण्यानुसार गोळी झाडण्यापूर्वी त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत जोरजोरात बोलणे सुरू होते. त्यावरून तपास अधिका-यांनी कौटुंबिक वादातून बॅनर्जी यांनी आत्महत्या केली असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली आहे.