आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे जगातील सर्वाधिक धोकादायक रेल्‍वे मार्ग, तोही महाराष्‍ट्रात, PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे  -   महाराष्‍ट्र असेही एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, येथील जो रस्‍ता आहे तो जगातील सर्वांत धोकादायक मार्गापैकी आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून कोणत्‍या प्रकारचे वाहन नेण्‍याला बंदी आहे. केवळ टॉय ट्रेनच त्‍या रस्‍त्‍यावरून धावते. त्‍यातही ही ट्रेन अगदी उंच उंच डोंग-यावरून दिसणा-या खोल दरीच्‍या कडेला  अगदी  खेटून धावते.  त्‍यामुळे आपसुकच प्रवाशांच्‍या काळजाची धडधड वाढते. भर थंडीत अंगाला घाम फुटतो. डोळे पांढरे होतात. विशेष  प्रशिक्षण घेतलेलाच चाकल या ठिकाणाहून ही ट्रेन चालतो. ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांनाही या धोकादायक प्रवाशाची माहिती दिली जाते. हे ठिकाण म्‍हणजे माथेरान (जि. रायगड) आहे. 27 सप्‍टेंबरला जागतिक पर्यटन दिन आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी ही खास माहिती...
 
सर्वाधिक वळण असलेला रस्‍ता
मुंबईजवळ असलेल्‍या नेरळ जंक्शनवरून ही ट्रेन सुटते. वाइड नॅरो गेज लाइनवरून ती धावते. हा प्रवास 21 किलो मीटरचा आहे. हा मार्ग जगातील सर्वाधिक वळण असलेला मार्ग आहे. तिचा ग्रेडियंट 1:20 एवढा आहे.  ही गाडी डोंगरावर चढते ती पेब  आणि माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून. या पॉईंटला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते.  माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे, माथेरान मध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले, की माऊंटबेरी पॉईंटच्या खाली असलेल्या दस्तूरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून सुमारे 1.5 कि.मी. किंवा चालत 20-25 मिनीटांच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केट पर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही ह्या मार्केटच्या अवतीभवती आहेत.असे म्हणतात की 1907 मध्ये ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली. माथेरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून असतो. इथे बहुतांशी लोक हे मराठीच आहेत.
 
देशातील सर्वांत लहान हिल स्टेशन
देशातील सर्वांत लहान हिल स्टेशनला दर्जा माथेरानला मिळाला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण 803 मी. किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.
माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या हाजीमलंगपासून ही डोंगर रांग सुरू होते. हाजीमलंगला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.
 
हवामान
इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. उन्हाळ्यात 200 ते 300, तर हिवाळ्यात 150 ते 250 असते. मे महिन्यात संध्याकाळ अल्हाददायक असते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. नुकताच होऊन गेलेल्या पावसानं माथेरान हिरवंगार झालेलं असतं. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. जून ते ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस पडतो. या काळात धुक्याचे साम्राज्य संपूर्ण माथेरानवर असते. सूर्यप्रकाशही फार कमीवेळा दिसतो. अगदी अलिकडेपर्यंत पावसाळ्यात पर्यटक येतच नसत. कारण जून ते सप्टेंबर आगगाडी आणि हॉटेल्स बंद असत. पण आता तरूण आणि प्रेमी युगुलांची या काळातही इथे बऱ्यापैकी गर्दी असते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा काय पाहाल माथेरानमध्‍ये...