ठाण्‍यात डॉक्टरने केला / ठाण्‍यात डॉक्टरने केला महिलेवर बलात्कार

May 04,2013 01:15:00 PM IST

ठाणे - दिव्यात तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्‍टरने बलात्कार केला. डॉक्टरने बलात्कार करण्‍यापूर्वी महिलेला बेशुध्‍द केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यातील डॉ विलियम जेकब याच्या दवाखान्यात 24 वर्षीय पीडित महिलेला उपचारासाठी दाखल करण्‍यात आले होते. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार जेबक याने तिला एक पदार्थ दिला व त्यानंतर ती बेशुध्‍द झाली. या दरम्यान तिच्यावर डॉक्टरने बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारावरून डॉक्टरविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

X