आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंबिवलीत डेंग्यूचे थैमान, मनसे विभागाध्यक्षाचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - डोंबिवलीत डेंग्यूने थैमान घातले असून अजूनही प्रशासन जागे झालेले नाही. रविवारपर्यंत डेंग्यूचे ९ बळी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी काळे यांनाही डेंग्यू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली विभाग अध्यक्ष सुधीर कदम यांचा रविवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्यावर आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याआधी दोन दिवसांपूर्वी स्वामीनाथन अय्यर या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. डोंबिवलीतील डेंग्यूचा तो आठवा बळी होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माधुरी काळे यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डोंबिवलीत डेंग्यू पसरत चालला असताना प्रशासनाने कोणतीही ठोस उपाय योजना केलेली नाही. प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहात आहे, असा सवाल संतप्त डोंबिवलीकरांनी उपस्थित केला आहे.
जळगाव शहरात आढळले डेंग्यू सदृश्य रुग्ण!
चारू तांड्यात 38 जणांना डेंग्यू
मराठवाड्यातील दोन तालुक्यांत डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ
डेंग्यू, चिकुनगुन्याचे दहा रुग्ण आढळले