आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dowry Case: Groom With His Mother Father Arrested In Thane

पाच कोटींचा हुंडा मागणा-या आई-वडीलांसह नवरदेव अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - पाच कोटींचा हुंडा मागणा-या वरासह त्याच्या आई-वडिलांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. साहिल जोगळेकर, राजेंद्र जोगळेकर आणि पल्लवी जोगळेकर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक विजय पनवेलकर यांनी तक्रार दिली आहे.
पनवेलकर यांच्या मुलीचा विवाह मुंबईतील साहिल जोगळेकर याच्याशी ठरला होता. या दाेघांचेही आधी प्रेम हाेते.
दाेन्हीकडील मंडळींनी त्यांना संमती देऊन २३ ऑगस्ट रोजी साखरपुडाही पार पडला. १६ डिसेंबर रोजी तारीख काढली हाेती. मात्र, त्यापूर्वी ७ डिसेंबर रोजी मुलाचे वडील राजेंद्र यांनी ‘५ कोटी रुपये देत असाल तरच लग्न करू’ असे पनवेलकर यांना सांगितले. मात्र, पनवेलकर यांनी नकार देऊन तिघांविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ितघांना अटक करण्यात आली. दरम्यान, सर्व प्रकाराने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे पनवेलकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.