आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंब्रा येथील कचरा वेचणारी तीन मुले वाहून गेली नाल्यात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- ठाणेसह परिसरात रविवारीरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची भंबेरी उडाली असताना मुंब्रा येथील कचरा वेचणारी तीन मुले सोमवारी सकाळी नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे ठाणे महापा‍लिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मुंब्र्यातील नारायण नगरात असलेला नाल्याला पूर आल्याने त्यात पिंकी राठोड, गीता राठोड व कल्लू राठोड ही तीन मुले वाहून गेली. तिघेही कचरा वेचण्याचे काम करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. तिघांपैकी पिंकी राठोड (वय 5) हिला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पिंकीला तत्काळ कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य दोघांचा शोध सुरु आहे.

ठाणे महापालिकेच्या गलथान कारभारावर टीका करताना अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.