आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drug Medicine Through Meal, Cook Get Three Years Jail

जेवणातून गुंगीचे अाैषध, स्वयंपाक्यास तीन वर्षांचा कारावास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - दांपत्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून २५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी ठाण्याच्या स्थानिक न्यायालयाने स्वयंपाक्यास तीन वर्षांचा कारावास ठोठावला आहे. सुब्रतो सन्याल असे आरोपीचे नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे. सत्यकाम राऊत यांच्या आईवडिलांसाठी स्वयंपाक करण्यासाठी सुब्रतोला ठेवण्यात आले होते. मात्र, ३० एप्रिल आणि १ मे २०१३ च्या रात्री त्याने राऊत दांपत्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि दागिन्यांसह २५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या औषधीमुळे राऊत यांच्या आईची तब्येत बरीच खालावली. त्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली. सुब्रतोला जून २०१३ मध्ये कोलकाता येथील त्याच्या घरून अटक करण्यात आली.