बदलापूर: पालिकेच्या गोडाऊनला / बदलापूर: पालिकेच्या गोडाऊनला आग, औषधे जळून खाक

दिव्य मराठी नेटवर्क

Jan 18,2013 03:16:00 PM IST

ठाणे- कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या गोडाऊनला गुरुवारी आग लागली. त्यात फवारणीसाठी ठेवलेली औषधे जळून खाक झाली. बदलापुरातील पाटीलपाडा, स्टेशनपाडा आणि संकल्पसिद्धी परिसरातील नागरीकांना आगीच्या धुरामुळे मळमळणे आणि उलट्यांचा त्रास झाला.
गोडाऊनला आज लागल्याचे समजताच बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेवून आग आटोक्यात आणली. पा‍लिकेच मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी घटनास्थळी जाऊन आगाची आढावा घेतला. ही नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

X
COMMENT