नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच / नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जण अटकेत

प्रतिनिधी

Feb 18,2013 02:55:00 PM IST

ठाणे - नुकताच विवाह झालेल्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ठाण्यात पाच जणांना अटक केली. याप्रकरणी पती जब्बार खाटीक त्याची आई अफरेझा, भाऊ अस्लम आणि सलीम आणि बहीण शबाना यांना पोलिसांनी अटक केली आहे. वाशी येथील जब्बार खाटीक याचा आयेशा हिच्याशी नुकताच विवाह झाला होता. जब्बारच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांपासून तिचा छळ सुरू केला होता. त्यामुळे तिने सततच्या छळाला कंटाळून रविवारी रात्री रॉकेलने पेटवून घेत आत्महत्या केली. त्यानंतर आयेशाच्या वडिलांनी जब्बार आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली.

X
COMMENT