नोकरीच्‍या बहाण्‍याने बांगलादेशातून / नोकरीच्‍या बहाण्‍याने बांगलादेशातून आणल्‍या होत्‍या मुली, 30 हजारांत विक्री

पीडित मुलगी पीडित मुलगी
आरोपी डालिया आरोपी डालिया
शाहिद अंसारी शाहिद अंसारी
बांगलादेशाचा बाबुअली अजगर खान बांगलादेशाचा बाबुअली अजगर खान

दिव्‍य मराठी वेब टीम

Feb 23,2016 09:40:00 AM IST
ठाणे - अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल आणि ठाणे क्राइम ब्रँचने भिवंडीमध्‍ये एका सेक्‍स रॅकेटचा भांडाफोड करून पती-पत्‍नीसह एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. त्‍यांच्‍या तावडीतून एका 20 वर्षीय युवतीची सुटका करण्‍यात आली.
वेगवेगळे अमीष देऊन बांगलादेशातील मुलींना भारतात आणले जात होते. नंतर या ठिकाणी त्‍यांच्‍याकडून वेश्‍याव्‍यवसाय करून घेतला जात होता. एवढेच नाही भारतातील वेगवेगळ्या शहरात त्‍यांना विकले जात होते.

- या मुलींची विक्री 10 ते 30 हजारांपर्यंत केली जात असे.
- मुलींना बांगलादेशापासून ते भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्‍याचे काम अनेक एजेंट करत होते. याचे सर्वात मोठे रॅकेट कोलकत्‍त्‍यामध्‍ये आहे.
- बांगलादेशातील कॉलेजमधील तरुणींसह आदिवासी भागांतील मुलींना नोकरीचे अमीष देऊन भारतात आणले जात होते.
- भिवंडीमध्‍ये भांडाफोड केलेल्‍या सेक्स रॅकेटमध्‍ये बांगलादेशातील सहा मुलींना भारतात आणले होते.
पाच मुली गायब
या प्रकरणात एकूण सहा मुलींना बांगलादेशातून भारतात आणले गेले होते. त्‍यापैकी पाच मुलींना आरोपींनी गायक केले. त्‍यांचा शोध पोलिस घेत आहेत.
नागपूरमध्‍ये झाला सौदा...
मुंबईच्‍या भिवंडी येथे मुक्‍त केलेल्‍या पीडित मुलीचा सौदा नागपूरमध्‍ये झाला होता. तिला 30 हजार रुपयांत विकले गेल्‍याचे चौकशीतून समोर आले. नागपूरच्‍या एका लॉजमधून संपूर्ण रॅकेट चालवले जात होते. नंतर मुंबईच्‍या भिवंडी बायपास, शील फाटा, डोंबवली, तालोजासह ठाण्‍याच्‍या अनेक भागात मुलींचा पुरवठा केला जात होता. बऱ्याच वेळा या मुलींना रात्री डान्‍सबारमध्‍ये डान्‍स करण्‍यासाठीही पाठवले जात होते.
असे आहे प्रकरण...
- पोलिसांनी एका NGO च्‍या मदतीने या रॅकेटचा भांडाफोड केला.
- त्‍याचे धागेदोरे भारताबाहेरही असल्‍याचे पोलिसांच्‍या प्राथमिक तपासातून समोर आले.
- ज्‍या तरुणीची यातून सुटका करण्‍यात आली तिला हॉटेलमध्‍ये नोकरी देण्‍याचे आश्‍वासन देऊन बांगलादेशातून भारतात आणले होते.
- सध्‍या वैद्यकीय तपासणीसाठी तिला पाठवण्‍यात आले.
कोण आहेत आरोपी...
शाहिद अंसारी त्‍याची पत्नी डालिया सह बांगलादेशाचा बाबुअली अजगर खान या तिघांना पोलिसांनी मुंबईतील भिवंडीमध्‍ये असलेल्‍या एका चाळीतून अटक केली.
पीडित तरुणी काय म्‍हणाली...
आरोपींच्‍या तावडीतून सुटलेली पीडित मुलगी म्‍हणाली, ''मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्‍ये नोकरी देण्‍याचे आश्‍वासन देऊन एजेंट खान याने सात महिन्‍यांपूर्वी मला बांगलादेशातून येथे आणले. परंतु, त्‍याने महाराष्‍ट्रातील अनेक शहरांमध्‍ये मला देहविक्री व्‍यवसाय करण्‍यास भाग पाडले. मी जर असे केले नाही तर मला तो मारहाण करत होता. एवढेच नाही तर काही डान्‍स बारमध्‍ये त्‍याने मला पाठवले. आता तो मला विकण्‍याच्‍या विचारात होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
X
पीडित मुलगीपीडित मुलगी
आरोपी डालियाआरोपी डालिया
शाहिद अंसारीशाहिद अंसारी
बांगलादेशाचा बाबुअली अजगर खानबांगलादेशाचा बाबुअली अजगर खान
COMMENT