आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा पर्यटक मुरुडच्या समुद्रात बुडाले, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड / मुरुड- येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाले आहेत. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे.

मुरुड समुद्र किनार्‍यावर पर्यटनासाठी आलेले सहाजण पोहण्यासाठी गेले होते. त्यांना लाटांचा अंदाज आला नसल्याने ते सुमुद्रात ओढले गेले. सहा जण समुद्रात बुडाल्यानंतर प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु केला आहे. दोन मृतदेह हाती लागले असून चार जणांचा शोध सुरु आहे. स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. असे, असतानाही पर्यटक समुद्रात गेले आणि ही दुर्घटना घडली आहे.

शनिवारी चेंबुर येथून 15 जण सहलीसाठी आले होते. स्थानिकांनी त्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव केला होता. मात्र, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि समुद्रात गेले, असे स्थानिकांनी सांगितले आहे.