चौदावर्षीय मुलीचा विनयभंग / चौदावर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा

Jan 22,2017 03:13:00 AM IST
ठाणे - चौदावर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्वर खल्पे असे शिक्षकाचे नाव आहे. अन्वर हा एका खासगी शाळेत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी अन्वरने मुलीला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले होते. वर्ग सुटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानुसार पालकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच अन्वर हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वीही त्याने असेच प्रकार केले का याचाही पोलिस शोध घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
X