Home | Maharashtra | Kokan | Thane | gas leakage causes problems for travelers on mumbai-pune expressway

गॅसगळतीमुळे नवरदेव अडकले वाहतुकीत, आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे वाजले बारा

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - May 03, 2013, 04:59 PM IST

8 तास अनेक प्रवासी वाहतुकीत अडकले होते. त्‍यामुळे त्‍यांचे प्रचंड हाल झाले.

 • gas leakage causes problems for travelers on mumbai-pune expressway

  खोपोली- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एलपीजीचा टँकर उलटला. जवळपास 8 तास वाहतूक ठप्‍प होती. या 8 तासांमध्‍ये प्रवाशांचे आतोनात हाल झाले. या अपघाताने द्रुतगती महामार्गाची कंत्राटदार आयआरबी कंपनीच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेचे बारा वाजल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. या प्रकारामुळे झालेल्‍या मनस्‍तापावरुन प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्‍यक्त केली.

  आज सकाळी एमएच-०४ सी ए ५९६४ क्रमांकाचा टॅक्‍र खोपोली जवळील अंडा पोइन्टजवळ उलटला. त्‍यानंतर सकाळी 9 वाजतापासून दोन्‍ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्‍यात आली. ही गळती धोकादायक होती. कोणत्‍याही क्षणी मोठा अपघात घडण्‍याची भीती होती. वाहतूक ठप्‍प ठेवण्‍यासोबतच टँकरच्‍या जवळपासच्‍या गाड्यांमधील लोकांना मोबाईलही बंद ठेवण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍यामुळे अनेकांचा संपर्क तुटला होता. घाटात मध्‍येच अडकलेल्‍यांकडे असलेले पाणी व खाण्‍याचे साहित्‍य संपल्‍यामुळे तर अडचणी आणखी वाढल्‍या. अनेकांकडे पाणी संपले. खाण्‍याची सोय नव्‍हती. मुंबई-पुणे दरम्‍यानचा हा जवळपास 2 तासांचा प्रवास आहे. परंतु, 8 तास अडकून पडल्‍यामुळे हाल झाले. पाणी नाही, खाण्‍याची सोय नाही. त्‍यामुळे आजचा दिवस या सर्वांसाठी प्रचंड मनस्‍ताप देणारा ठरला.

  नवरदेवांच्‍या लग्‍नाचे वाजले बारा
  अपघातामुळे तब्‍बल 8 तास वाहतूक बंद होती. त्‍यानंतर हळूहळू वाहतूक सुरु करण्‍यात आली. परंतु, यामुळे लग्‍नाची अनेक व-हाड यात अडकली होती. काही नवरदेवही अडकले होते. अनेकांचा विवाह दुपारी होता. तर अनेकांचा विवाह सायंकाळी होता. दुपारी विवाह असलेले नवरदेव वेळेत पोहोचू शकले नाही. स्‍वत-च्‍याच लग्‍नात त्‍यांच्‍या डोक्‍यावर अक्षता पडल्‍या नाही.

  याशिवाय अनेक जणांना विमान प्रवास करायचा होता. त्‍यांना वेळेच्‍या आत विमानतळावर पोहोचता आले नाही. अखेर अनेकांचे विमान सुटले.

  आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे वाजले बारा

  गॅस गळती सुरु झाल्‍यानंतर आवश्‍यक ती यंत्रणा आयआरबीकडे नाही. त्‍यामुळे गळती रोखण्‍यासाठी तज्ञांना संपर्क करावा लागला. परंतु, या कंपनीला 2 तासांनी संपर्क करण्‍यात आला. त्‍यातच वाहतुकीचा खोळंबा झाल्‍यामुळे तज्ञ पोहोचण्‍यास आणखी विलंब झाला. तज्ञांनी काही मिनिटांमध्‍ये गळती बंद केली. परंतु, त्‍यांना संपर्कच उशीरा केल्‍यामुळे लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला.

Trending