आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर सोडून गेलेल्‍या पुण्‍याच्‍या तरुणीवर खोपोलीत सामुहिक बलात्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोपोली- सामुहिक बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना खोपोली येथे एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी वडीलांसोबत भांडण झाल्‍यामुळे घर सोडून आली होती. तिच्‍या परिस्थितीचा फायदा घेऊन 5 जणांनी सलग पाच दिवस एका लॉजमध्‍ये तिच्‍यावर बलात्‍कार केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्‍यांची चौकशी सुरु आहे. खोपोलीमध्‍ये राहणा-या एका मुलीला फूस लावून पळविल्‍यानंतर बलात्‍काराची घटना ताजी असतांनाच या घटनेने खळबळ उडाली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, पुणे येथील एक तरुणी वडीलांशी भांडण झाल्याने घर सोडून पळाली होती. काही दिवसांपूर्वी ती खोपोली रेल्वे स्थानकात आली असता येथील तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. सलग पाच दिवस तिच्यावर हे नराधम पाशवी बलात्कार करीत होते. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्‍याचार केले. सर्वप्रथम त्यांनी खोपोलीतील प्रसिद्ध चंद्रविलास लॉजमध्ये तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याची माहिती पुढे आली आहे. तिथून तिला अनेक ठिकाणी फिरवले.

या नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर मुलगी घरी पोहोचली. तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील एका पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना खोपोली येथील असल्याने पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खोपोली पोलीसांकडे वर्ग केला. खोपोली पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून वेगाने तपास केला. काही तासातच पोलिसांनी संशयितांना ताब्‍यात घेतले.

काही दिवसांपूर्वी खोपोलीच्‍या मुलीला पळवून बलात्‍कार केल्‍याची घटना घडली होती. पुण्‍यातील येरवडा भागात राहणारा अविनाश भालेराव या तरुणाने खोपोली येथील एका अल्पवईन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावली. तिला शाळेच्या वेळात पळवून नेले. त्यानंतर त्याने तिच्याशी शरीरीक संबंध ठेवले. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या घरच्यांनी खोपोली पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी पिडीत मुलगी व आरोपी अविनाश याला शोधून काढल्यावर सदर मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्या प्रकरणी गुन्हा नोंदवून अविनाश भालेराव (19) ला अटक केली. दोन्‍ही घटनांमुळे खोपोलीमध्‍ये खळबळ उडाली आहे.