Home | Maharashtra | Kokan | Thane | girl locked in lift thane

ठाण्यात अल्पवयीन मुलगी लिफ्टमध्ये अडकली

प्रतिनिधी | Update - Aug 18, 2013, 04:11 AM IST

सातव्या मजल्यावरील फ्लॅटवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेलेली पंधरावर्षीय मुलगी सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना ठाण्यात घडली.

  • girl locked in lift thane

    ठाणे - सातव्या मजल्यावरील फ्लॅटवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेलेली पंधरावर्षीय मुलगी सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना ठाण्यात घडली. पूजा जाधव असे मुलीचे नाव असून तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाण्यातील तुलसीदास सोसायटीत पूजा आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. शनिवारी सकाळी पूजा बाहेर गेली होती. यानंतर दुपारी परतल्यानंतर ती सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढली. मात्र, मध्येच अचानक लिफ्ट बंद पडली. काही जणांनी तिला लिफ्टमध्ये जाताना पाहिले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर लिफ्टचे दार तोडून तिला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

Trending