आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hasband Arrested Due To Violence Against His Wife

पत्नीला चटके व चावाने छळवणूक करणा-या पतीला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - पतीने पत्नीला गरम वाटीचे चटके व चावाने अमानुष छळवणूक केल्याची घटना उजाडात आली आहे.यात महिला जखमी झाली असून तिला छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.आरोपी पतीला अटक करण्‍यात आली आहे.
आरोपी रूपेश तांडेल,पत्नी भानुमती व तीन वर्षांच्या मुलासह कळव्यातील भूसार आळीत राहत आहे.रूपेश यांच्या ने‍हमीच्या भांडणांना कंटाळून पत्नीने दोन महिन्यापूर्वी विटावा या आपल्या माहेरी निघून गेल्या.घरी येण्‍याचे फोनवरून सांगून त्याला पत्नीकडून नकारच मिळत होता.यामुळे तो प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन तिला घरी घेऊन आला.तेव्हापासून त्यांने तिला चावा घेतले व गरम वाटीने चटक देऊन जखमी केले.हा अमानुष प्रकार गेल्या दहा दिवसांपासून चालू होता.संबंधित प्रकार शेजा-यांनी पीडित महिलेच्या वडीलांना कळवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे, असे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांनी सांगितले.