कोकणातील हा गड / कोकणातील हा गड आहे जगातील धोकादायक किल्‍ल्‍यापैकी एक, PHOTOS

या उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-या या उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-या
या उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-या या उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-या
किल्‍ल्‍याचे एक प्रवेशद्वार किल्‍ल्‍याचे एक प्रवेशद्वार
किल्‍ल्‍याभोवजी घनदाट जंगल आहे. किल्‍ल्‍याभोवजी घनदाट जंगल आहे.
2300 फूट उंचावर तो आहे. 2300 फूट उंचावर तो आहे.
किल्‍ल्‍यावरून मुंबई हायवेचे दिसणारे दृश्‍य. किल्‍ल्‍यावरून मुंबई हायवेचे दिसणारे दृश्‍य.
किल्‍ल्‍यावर जाण्‍यासाठी असलेली पायवाट. किल्‍ल्‍यावर जाण्‍यासाठी असलेली पायवाट.

दिव्‍य मराठी वेब टीम

Sep 24,2015 10:52:00 AM IST
ठाणे - येत्‍या 27 सप्‍टेंबरला जागतिक पयर्टन दिन आहे. त्‍या अनुषंगाने जगातील धोकादायक किल्‍ल्‍यापैकी एक असलेल्‍या गडाविषयी divyamarathi.com माहिती देणार आहे. माथेदार आणि पनवेलदरम्‍यान तब्‍बल 2300 फूट उंचावर तो आहे. वर गेल्‍यानंतर दाट जंगल लागते. त्‍यामुळे एकट्या, दुकड्यांनी किल्‍ल्‍यावर जाणे म्‍हणजे धाडसाचेच आहे. प्रबळगड या नावाने त्‍याला ओळखले जाते. सायंकाळ होताच या ठिकाणी कुणीही थांबत नाही.

चढण्‍यास सर्वात अवघड
हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड आहे. प्रबळगड चढण्‍यासाठी अत्‍यंत अवघड असल्‍याने या ठिकाणी फारसे पयर्टक‍ येत नाहीत. पण, जे येतात त्‍यांना सूर्यास्‍तापर्यंतच थांबू दिले जाते.

किल्‍ल्‍याचा इतिहास
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पाण्‍याच्या टाक्यासुद्धा आहेत. मात्र, ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र, गडावरून माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा प्रबळगडावरील धोकादायक रस्‍ते...
X
या उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-याया उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-या
या उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-याया उंच डोंबरावर हा किल्‍ला आहे. त्‍यावर चढण्‍यासाठी असलेल्‍या पाय-या
किल्‍ल्‍याचे एक प्रवेशद्वारकिल्‍ल्‍याचे एक प्रवेशद्वार
किल्‍ल्‍याभोवजी घनदाट जंगल आहे.किल्‍ल्‍याभोवजी घनदाट जंगल आहे.
2300 फूट उंचावर तो आहे.2300 फूट उंचावर तो आहे.
किल्‍ल्‍यावरून मुंबई हायवेचे दिसणारे दृश्‍य.किल्‍ल्‍यावरून मुंबई हायवेचे दिसणारे दृश्‍य.
किल्‍ल्‍यावर जाण्‍यासाठी असलेली पायवाट.किल्‍ल्‍यावर जाण्‍यासाठी असलेली पायवाट.
COMMENT