ठाणे - रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरसह दोघांची ठाणे सत्र न्यायालयाने मुक्तता केली आहे. हिना सय्यद (23) ही महिला वाशी येथील एका रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. या वेळी मुलाला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगत हिनाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व इतर दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची मुक्तता केली.