आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वचन पाळण्यासाठी हजर झालो, राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राहुल यांना न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली होती. तरीही राहुल सकाळी ११ वाजता हजर झाले. ‘न्यायालयासमोर उपस्थित राहीन असे वचन मी दिले होते, ते पूर्ण करण्यासाठीच मी हजर झालो,’ असे त्यांनी सांगितले.

न्यायालयाचा आदर करतो : राहुल गांधी न्यायालयात उपस्थित राहतील, असे त्यांच्या वकिलाने ३० मार्चला सांगितले होते. त्यानुसार ते न्यायदंडाधिकारी डी. पी. काळे यांच्यासमोर हजर झाले. ते १५ मिनिटे न्यायालयात होते. ‘आम्ही न्यायालयाचा आदर करतो. त्यामुळे मी येथे उपस्थित आहे. मी न्यायालयाला वचन दिले होते. ते पूर्ण करण्यासाठीच मी येथे आलो आहे,’ असे ट्विट राहुल यांनी पोस्ट केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहे, असा कथित आरोप राहुल यांनी निवडणूक प्रचार सभेत केला होता. त्यावरून भिवंडी येथील रा. स्व. संघाचे सचिव राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. राहुल गांधी कोर्टात उपस्थित राहणार की नाही याची नागरिकांत उत्सुकता होती.
बातम्या आणखी आहेत...