आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी व मुलीची हत्या; हवाईदलाच्या अधिकार्‍याला जन्मठेपेची शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - पत्नी व पाचवर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी हवाईदलाच्या अधिकार्‍याला स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजेशकुमार भाडोरिया असे अधिकार्‍याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच जोधपूर येथील हवाई दलातील अधिकार्‍याला विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यानंतर आलेल्या या निर्णयाने भारतीय हवाई दलाबद्दल उलट सूलट चर्चा सुरु झाली आहे.

भाडोरिया ठाण्यात पत्नी व पाचवर्षीय मुलीसह राहत होता. मार्च 2010 मध्ये त्याचा पत्नीशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे भाडोरियाने पत्नी व मुलीला दगडाने ठेचून ठार केले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. एकूण 18 साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली.