आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्हासनगरात अनाधिकृत बांधकाम कोसळले; दोन मजुरांचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- उल्हासनगरातील कॅम्प 4 परिसरातील 26 सेक्शनमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास एक अनाधिकृत बांधकाम कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अन्य दोन मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

उल्हासनगर सेक्शन 26 परिसरातील महालक्ष्मी हॉटेलच्या मागे गुरुमुखसींग गुरुनासिंघानी यांच्या घराचे अनाधिकृत बांधकाम सुरु होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास हे बांधकाम सुरु असताना ते अचानक कोसळले. या दुर्घटनेत भुजी राठोड आणि तुकाराम राठोड या मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शिवानी राठोड व बाबू राठोड हे दोन मजूर जखमी झाले आहेत.
या घटनेची मा‍हिती मिळताच अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे सहाय्यक आयुक्त युवराज भदाणे यांनी पथकासह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.