अवैध मासेमारी करणारे / अवैध मासेमारी करणारे ट्रॉलर्सच अडकले जाळ्यात, मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई

प्रतिनिधी

Sep 19,2013 07:10:00 AM IST

मालवण - तालुक्यातील सागरी हद्दीतील तळाशिल येथे अवैध मासेमारी करणार्‍या रत्नागीरीतील दोन मिनी पर्ससीननेट ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमार व मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांच्या जाळ्यात अडक ले. यातील एका टॉलरवर बांगडा व काप मासळी आढळून आली. तर दुसरे टॉलर अधिकृत असल्याने तो सोडून देण्यात आले.

सांगरी हद्दीत सुरुवातीपासून मिनी पर्ससीननेटधारकांनी अवैध मासेमारी करायला सुरवात केली होती. यामुळे पारंपारीक मच्छीमारांचा व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांनी सबंधितावर कारवाई करण्याची मागणी मत्स्य व्यवसाय विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार मत्स्य व्यवसाय विभागाने जिल्ह्यातील मिनी पर्ससीननेटधारकांना नोटीस बजावली होती. तरीही या नोटीसांना न जुमानता अतिक्रमण व अवैध मासेमारी सुरुच ठेवली. मंगळवारी तळाशिल सागरी हद्दीत रत्नागिरीतील दोन मिनी पर्ससीननेट धारक मासेमारी करतांना आढळून आले. याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आली. लगेच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आर.आर महाडिक त्यांच्या कर्मचार्यासह उपस्थित झाले आणि त्यांनी दोन्ही ट्रॉलर ताब्यात घेतले. ट्रॉरची तपासणी केली असता एक ट्रॉलर्स अधिकृत असल्याने त्याला सोडून देण्यात आले तर दुसर्या टॉलर्सवर मोठ्या प्रमाणात बांगडा आणि काप मासळी आढळून आल्या. ट्रॉलरवर 26 खलाशी होते आणि
त्याचा परवानाही नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

मासळींचा लिलाव
तळाशिलच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी करणारे दोन ट्रॉलर्स मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी पकडल्याची माहिती मिळताच श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, छोटू सावजी, विकी तोरसकर, बाबी जोगी यांच्यासह तळशिला व दांडी येथिल असंख्य मच्छिमार बंदर जेटीवर उपस्थित झाले होते. पकडण्यात आलेल्या बांगडा आणि काप मासळीचा सायंकाळी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थित 22 हजार रुपयात मासळीचा लिलाव करण्यात आला.

X
COMMENT