आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Its Not Unfair To Meet Any Chief Ministers, Sharad Pawar Asked Question

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एखाद्या मुख्यमंत्र्याची भेट घेण्यात गैर काय, शरद पवार यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटतच असतो. मग त्यात गैर ते काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा पवारांनी त्याचे खंडण केले होते. परंतु शनिवारी स्वत:हून त्यांनी याबाबत खुलासा केला.
देशात अधिकाधिक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन व्हावे ही कृषिमंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा राज्यांत दौरेही करावे लागतात. प. बंगालमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतो. ओडिशात नवीन पटनायक, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत असतो, असे सांगून पवार म्हणाले की, एक दिवस अचानक मी नरेंद्र मोदींना भेटल्याची बातमी आली. अखेर यात गैर ते काय आहे? एखाद्या पाकिस्तानी किंवा चीनी व्यक्तीला तर भेटून मी आलो नव्हतो ना?