अलिबाग येथे जैन / अलिबाग येथे जैन साधूची निर्घृण हत्या,दोघांना अटक

Dec 04,2013 12:02:00 AM IST
अलिबाग - इंदापूरजवळील पोटनेर येथील जैन मंदिरात सोमवारी मध्यरात्री मुनीश्वर प्रशांतविजयजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. दरम्यान, किरकोळ रकमेसाठी ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री मुनीश्वर आपल्या खोलीत विश्रांती करत असताना प्रकाशकुमार गर्ग आणि फुलाराम नवरामजी मेघराज यांनी खोलीत घुसून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनी मुनींच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. प्रशांतविजयजी गेले 11 वर्षे या मंदिरातून अहिंसा आणि शांतीचा संदेश देत होते.
X