Home | Maharashtra | Kokan | Thane | jharkhand producer beaten by girl

अश्लील संभाषण करणा-या चित्रपट निर्मात्याला तरुणीने चोपले

प्रतिनिधी | Update - Oct 28, 2013, 12:34 AM IST

झारखंड येथील ज्योतिकुमार याने एका हॉटेलमध्ये तरुणीला बोलावले होते.

  • jharkhand producer beaten by girl

    ठाणे - ‘चित्रपटात काम देतो’ असे सांगून मुलाखतीस बोलावून अश्लील संभाषण करणा-या निर्मात्याला तरुणीने चोप दिला. ही घटना ठाण्यात घडली. दरम्यान, घटना समजल्यानंतर तिच्या मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

    झारखंड येथील ज्योतिकुमार याने एका हॉटेलमध्ये तरुणीला बोलावले होते. त्याने तिच्याशी अश्लील संभाषण करत ‘चित्रपटात काम करायचे असेल, तर त्याग करण्याची तयारी आहे का’, असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने त्याच्या श्रीमुखात भडकावली. इतकेच नव्हे तर त्याला रस्त्यावर सर्वांसमोर बाहेर आणत चोप दिला. या प्रकाराची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनीही त्याला यथेच्छ चोप दिला. तरुणीची पाया पडून माफी मागितल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

Trending