आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्‍याणमध्‍ये भिकाऱ्याच्‍या घराला आग, जळाल्‍या तीन गोणी नोटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुळालेल्‍या नोटा दाखवताना आणि भिकाऱ्याची पत्‍नी - Divya Marathi
जुळालेल्‍या नोटा दाखवताना आणि भिकाऱ्याची पत्‍नी
ठाणे - कल्‍याण परिसरात भीख मागून आणि कचरा वेचून आपल्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्ध भिकाऱ्याच्‍या घरात आग लागली. यात तीन गोणी नोटा जळून खाक झाल्‍या. ही घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्‍यान, या भिकाऱ्याने इतर काही गोण्‍या बाहेर सुरक्षित लपवून ठेवल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.
मदतीसाठी आलेले झालेले आवक्
आग विझवण्‍यासाठी मदतीसाठी आलेले लोक हा प्रकार पाहून आवक् झाले. या तीनही गोण्‍यांमध्‍ये नोटांना कोंबून भरण्‍यात आले होते.
कशी लागली आग.....
- कल्याण येथील लहुजीनगरातील मोहने येथील लहुजीनगर वसाहतीमधील एका झोपडीत मोहम्मद रेहमान या वृद्ध नागरिकाचे कुटुंब राहते.
- मंगळवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली.
- दिवा कलंडल्याने ही आग लागल्याचे सांगण्‍यात येते.
- रेहमान हा भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. - घरात कपाट नसल्याने भीक मागून जमा झालेले पैसे या गोण्यांमध्ये भरून ठेवल्याची माहिती त्यांची पत्नी फातिमा यांनी दिली.

पुढे वाचा, आग विझवल्‍यानंतर नोटा गोळा करण्‍याची गडबड