आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीर्थयात्रेला गेलेल्या कल्याणच्या भाविकाचा उत्तराखंडात मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण- चारधाम तीर्थयात्रेला गेलेल्या कल्याण येथील मिलापकुंज सोसायटीतील रहिवासी बच्छुलाल चव्हाण (वय-47) या भाविकाचा उत्तराखंड येथील भूस्खलनात मृत्यू झाला.
चव्हाण हे आपल्या चार मित्रांसोबत चारधाम यात्रेला उत्तराखंड येथे गेले होते. परंतु उत्तराखंडात ढगफुटी झाल्याने रस्ते, पूल तसेच गावे भूस्खलनात उद्ध्वस्त झाले. दरम्यान, चव्हाण हे चंदाली येथून हरिद्वारकडे पायी जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यामधील एक दगड त्यांच्या डोक्यावर लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या मित्रांनी कळविले आहे. मयत बच्छुलाल चव्हाण हे मुंबईत कॉन्ट्रॅक्टर होते.