आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कर्मचार्‍यांना स्वसंरक्षणाचे धडे, केडीएमसीचा उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे अत्याचार रोखायचे असतील तर कुणी येईल आणि मदत करेल या भ्रमात न राहता महिलांनी स्वत:हून विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठीच कल्याण-डोंबिवली महामालिका (केडीएमसी) प्रशासनाने एक उपक्रम हाती घेतला आहे. प्रशासनाकडून महिला कर्मचार्‍यांसाठी कराटेचे प्रशिक्षण सुरु केले जाणार आहे. येत्या 18 जानेवारी ते 4 फेब्रुबारी या कालावधीत कार्यालयीन वेळेतच कर्मचार्‍यांना प्रसिद्ध ज्युडो कराटेपटू लीना मॅथ्यू ओक प्रशिक्षण देणार आहेत.
पालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार्‍या या प्रशिक्षणासाठी दुपारी 3 ते 5.30 या वेळेत महिलांना सुटी देण्याचेही आदेश संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहे. ही सवलत प्रशिक्षणासाठीच असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. पालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार महिलांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.