आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खालापूर रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सुरु

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोपोली: खालापूर येथील माऊंट व्ह्यू रिसॉर्टमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी 251 तरुण-तरुणी वैद्यकीय चाचणीत पॉझेटिव्ह आढळल्याने खालापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. घाटकोपर येथून गुरुवारी चार जणांना अटक केली. नयन कांबळे, नीरज चौधरी, विजय ताजने, मयांक जोशी अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. उर्वरित 230 आरोपींना टप्प्या-टप्प्याने अटक केली जाईल, अशी माहिती खालापूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी नम्रता पाटील यांनी दिली.
विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना आणि अभिनेत्री आसावरी जोशी यांच्या मुलांचा समावेश असून पुढील टप्प्याच्या कारवाईत यांना अटक होण्याची शक्यता आहे.