आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील जमीनीची होणार फेरमोजणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - ब्रिटिश काळखंडानंतर प्रथमच राज्यात जमिनीची फेरमोजणी होत असल्याची माहिती
कोकण विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक विलास पाटील यांनी दिली.


ठाण्‍यात भूमी अभिलेख विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. जमीन फेरमोजणीची प्रायोगिक तत्त्वावरील कामे पुण्‍यातील मुळशी तालुक्यात सुरू करण्‍यात आली आहे. जमीन मोजणीच्या कामाचे आता पूणपणे संगणकीकरण करण्‍यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना केव्हाही जमिनीची माहिती मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यात, दुस-या टप्प्यात 12 , तर अंतिम टप्प्यात उर्वरित जिल्‍ह्यांमध्‍ये जमीन फेरमोजणीची कामे केली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.