आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लकी इमारत दुर्घटनाप्रकरणी बिल्डरांनी जामीन अर्ज मागे घेतला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- लकी इमारत दुर्घटनाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन मुख्य बिल्डरांनी दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. अजीज सिद्दिकी आणि जमील शेख अशी आरोपींची नावे आहेत. प्रसिद्ध विधिज्ञ माजिद मेमन यांच्यामार्फत दोघांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असल्याने दोघे अर्ज मागे घेत असल्याचे मेमन यांचे सहवकील सुनील भारके यांनी न्यायालयात सांगितले.