मंगला एक्स्प्रेसचे तीन / मंगला एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दिव्य मराठी वेब टीम

Feb 22,2013 06:34:00 PM IST

पेण- पेण रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एर्नाकुलम निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेसचे तीन डबे रूळावरून घसरले. अंतोरा फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. त्यामुळे पाच तासांपासून कोकण रेल्वेचे वाहतूक ठप्प झाली आहे.

पेण रेल्वे स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेस आली असता क्रॉसिंगजवळ मंगला एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून घसरले. हैदराबादेतील बॉम्बस्फोटाची घटना ताजी असताना ही दुर्घटना घडली. एक्स्प्रेस रुळावरून घसरताना जोरात आवाज झाला. बॉम्बस्फोट झाल्याची भीतीने काही प्रवाशानी गाडीतून बाहेर उड्या घेतल्या. क्रॉसिंग करताना गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे जिवित हानीही झाली नाही.

स्थानिक रेल्वेच्या अधिकारी तत्काळ घटना स्थळी पोहचून एक्स्प्रेसचे शेवटचे पाच डबे वेगळे करून गाडी रवाना करण्यात आली. परंतु घसरलेले डबे रुळावरून बाजूला करण्यासाठी साधारण चार ते पाच तास लागणार असल्याचे कोकण रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा अपघाताचे फोटोज्...

X
COMMENT