वांगणी - येथे घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी आहेत. संततधार पावसामुळे भिंत कोसळी असल्याचे सांगितले जात आहे.
नागपुरे कम्पाउंड येथे ही दुर्घटना झाली. यात शांताबाई सोनवणे (62) आणि मालसा हतागडे (25) यांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांच्या मुलीसह तीन जण जखमी आहेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.
कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे भिंत कोसळली. आज (सोमवार) सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा लोकल रेल्वेवर परिणाम झाला असून वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
दरम्यान, पनवेलमध्ये रिकामी इमारत शेजारच्या घरावर कोसळली. यात तीन जण जखमी झाले आहेत. ही इमारत 50 वर्षे जुनी होती. पालिकेने तिला धोकादायक घोषित केल्यानंतर रिकामी करण्यात आले होते. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ही इमारत कोसळली.
पुढील स्लाइडमध्ये, पुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट