आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणमध्ये एक कोटी 28 लाखाची वीच चोरी उघडकीस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण: वाडा येथील योगेश स्टोन क्रशींग कंपनीत सुमारे एक कोटी 28 लाख 93 हजार 502 रूपयांची वीज चोरी उघडकीस आल्याने एक खळबळ उडाली आहे. कंपनी मालकासह चार जणांविरुद्ध कल्याण पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश स्टोन कंपनीत रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
माजी आमदार योगेश पाटील, रमेश पाटील, राजीव पाटील आणि परेश पाटील अशी आरोपींची नावे असून या चौघांच्या विरुद्ध विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश स्टोन क्रशींग कंपनीने एकूण 12 लाख 78 हजार 311 युनिटची वीच चोरी केल्याचे आढळून आल्याने महावितरण कंपनीने एक कोटी 28 हजार 93 हजार 502 रूपयांचे बील बजावले आहे.
महावितरणचे प्रभारी कार्यकारी संचालक आणि कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभ‍ियंता एस. एम. राठोड, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, चाचणी विभागाचे कार्यकारी अभ‍ियंता बी.एम. निर्मळ, सहा. अभ‍ियंता जेडी अंबादे, आर.एस. संत, वाडा उपविभागाचे सहा. अभियंता विनय काळे व वरिष्ठ तंत्रज्ज्ञ जे. एम. घुटे यांनी ही कारवाई केली.