आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Major Accident On Mumbai Goa Highway, 7 Killed, 32 Injured

मुंबई- गोवा महामार्गावर कंटेनर- बसच्या अपघात, ७ ठार, ३२ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी - कंटनेर आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ७ ठार, तर ३२ जण जखमी झाल्याची घटना मुंबई- गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. प्रभाकर क्षीरसागर, संतोष करंजकर, नारायण कुलकर्णी, भास्कर कोकाटे, राजाराम कुलकर्णी, िवजया सुर्वे आणि यशवंत माेहिते अशी मृतांची नावे आहेत.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरच्या धडकेने एसटी एका झाडाला अडकल्याने दरीत पडता पडता वाचली. दोन तासांहून अधिक वेळ एसटीतील प्रवासी गाडीतच अडकून पडले होते. बुधवारी सकाळी दहा वाजता एसटी चिपळूणहून रत्नागिरीकडे जात होती. या वेळी रत्नागिरीजवळील बाव नदीजवळ कोळसा घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरने एसटीला समोरासमोर धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, एसटी आंब्याच्या झाडाला टांगली गेली. यात सात जण जागीच ठार झाले. एसटीत ४५ प्रवासी होते. दरम्यान, दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन जवान व परिसरातील नागरिकांनी एसटीतील जखमी व इतर प्रवाशांना बाहेर काढले.