आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Burnt Alive For Secret Formula To Get Silver From Herbs

चांदी बनविण्‍याच्‍या फॉर्म्‍युला मिळविण्‍यासाठी एकाला जिवंत जाळले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- वनस्‍पतींपासून चांदी बनविण्‍याचा गुप्‍त फॉर्म्‍युला प्राप्‍त करण्‍यासाठी ठाणे जिल्‍ह्यात एकाची कारमध्‍ये जिवंत जाळून हत्‍या करण्‍यात आल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्‍ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली होती. परंतु, तपासानंतर सत्‍य बाहेर आले आणि सर्वांना धक्‍काच बसला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्‍यात आली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, मृतकाचे नाव नरेंद्र पटेल (51) असे आहे. सोमवार 3 जून रोजी पालघर आणि केळवा मार्गात दासगाव पाडा येथे एक कार संपूर्णपणे जळालेलया अवस्‍थेत आढळून आली होती. त्‍यात एका व्‍यक्तीचा जळून कोळसा झालेला मृतदेहदेखील होता. पोलिसांनी गाडीच्‍या नंबर प्‍लेटवरुन मालकाचा शोध लावला. त्‍यावरुन जळालेली व्‍यक्ती पटेल असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पटेल यांच्‍या फोन कॉल्‍सवरुन आणखी माहिती समोर आली. त्‍यांनी करण कक्‍कड (23) नावाच्‍या तरुणाशी फोनवरुन संभाषण केल्‍याचे लक्षात आले. पोलिसांनी कक्‍कडला ताब्‍या घेऊन सत्‍य शोधून काढले