सर्वात मोठे बॅग / सर्वात मोठे बॅग पेंटिंग, मनीषा गिनीज बुकात

Apr 23,2013 10:41:00 AM IST

ठाणे - मनीषा ओगले यांनी सर्वात मोठय़ा बॅगमध्ये पेंटिंग करण्याचा विश्वविक्रम केला. त्यांनी पर्यावरण सुरक्षेवर रविवारी 21 फूट लांब, 27 फूट रुंद कापडी पिशवीवर दहा तास 44 मिनिटांपर्यंत पेंटिंग केली. त्यात जागोजागी पाणी वाचवा, झाडे वाचवा, नो प्लॅस्टिक बॅग आदी संदेशही लिहिले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले आहे. सर्वात मोठा हँड पेंटेड कुर्ता (40x20 फूट) तयार करण्याचे लिम्का रेकॉर्डही त्यांच्या नावे आहे.

X