Home | Maharashtra | Kokan | Thane | Marathi Natyasammelan Starts In Thane

अपूर्व जल्लोषात, ढोलच्या गजरात निघाली नाट्यदिंडी

समीर परांजपे | Update - Feb 20, 2016, 04:17 AM IST

पुण्यानंतर महाराष्ट्रात नावाजलेली सांस्कृतिकनगरी म्हणजे ठाणे. याच महानगरात हाेणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त शुक्रवारी दुपारी ख्यातनाम नाटककार श्याम फडके यांच्या ब्राह्मण सोसायटीतील निवासस्थानापासून अपूर्व उत्साहात नाट्यदिंडी काढण्यात अाली.

 • Marathi Natyasammelan Starts In Thane
  ठाणे - पुण्यानंतर महाराष्ट्रात नावाजलेली सांस्कृतिकनगरी म्हणजे ठाणे. याच महानगरात हाेणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त शुक्रवारी दुपारी ख्यातनाम नाटककार श्याम फडके यांच्या ब्राह्मण सोसायटीतील निवासस्थानापासून अपूर्व उत्साहात नाट्यदिंडी काढण्यात अाली.

  नाट्यदिंडीतील पालखीत नटराजाची मूर्ती व आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे छायाचित्र ठेवलेले होते. पालखी उचलण्याचा मान ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार राजन विचारे यांना मिळाला. ढोल-ताशे, लेझीम पथक, वारकऱ्यांची भजनी मंडळे, बँड पथके यांच्या सूरसंगतीत ही नाट्यदिंडी रवाना झाली.

  ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून ठाणेकर नाट्यदिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत हाेते. दिग्दर्शक कुमार सोहोनी, कलाकार लीलाधर कांबळी, सिंड्रेला चित्रपटाचा दिग्दर्शक किरण नाकती असे नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अगदी मोजकेच मान्यवर यात सहभागी झालेले होते. बाकीच्या इतर कलावंतांनी मात्र नाट्यदिंडीकडे पाठ फिरवली. आळंदी येथील अलंकापुरी अाध्यात्मिक शिक्षण संस्था, ग्यानदीप वारकरी मंडळ, संत जनाबाई मंडळ त्याचप्रमाणे केरळी पारंपरिक वाद्यपथकही सहभागी झाले होते.

  मांजरेकरांना निमंत्रण नाही
  आपल्याला नाट्यसंमेलनाचे निमंत्रण मिळाले नसल्याची खंत प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. मांजरेकरांचे सध्या ठाणे परिसरातच चित्रीकरण करत अाहेत. मात्र निमंत्रण नसल्याने ते संमेलनाकडे फिरकले नाहीत. दरम्यान, ‘मानापमानाचा विचार न करता सर्वच कलाकारांनी सहभागी व्हावे,’ अशी प्रतिक्रिया नाट्य परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. मांजरेकर हे मनसेशी संबंधित असून या संमेलनाच्या अायाेजनात शिवसेनेचा सहभाग अाहे.

Trending