आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे : फोनवर बोलायचा अश्लिल, महिलांनी विवस्‍त्र करून काढली धिंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - येथील ऐरोली परिसरातील एका अल्‍पवयीन मुलीला कॉल करून तिच्‍याशी अश्‍लील बोलणाऱ्या एका तरुणाला परिसरातील महिलांनी शनिवारी रात्री चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्‍याला निवस्‍त्र करून बाजारातून धिंड काढली. सुशीलकुमार जयस्‍वाल (21) असे त्‍या युवकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण...
> महिलांचे नंबर मिळवून सुशील त्‍यांच्‍यासोबत फोनवर अश्‍लील बोलायचा.
> त्‍यामुळे या परिसरातील महिला त्रस्‍त झाल्‍या होत्‍या. पण, त्‍याची ओळख पटत नव्‍हती.
> काही दिवसांपूर्वी त्‍याने एका 15 वर्षीय मुलीला कॉल केला.
> मुलीने या बाबत आपल्‍या कुटुंबीयांना माहिती दिली.
> तिच्‍या कुटुंबीयांनी या बाबत 'मनसे' महिला कार्यकर्त्‍यांना सांगितले.
सुशील अशा अडकला जाळ्यात
> महिला कार्यकर्त्‍यांनी त्‍या मुलीला सांगितले की, सुशीलसोबत फोनवर बोलून त्‍याचे नाव आणि पत्‍ता विचारून घे आणि भेटायला बोलव.
> तिने तसेच केले.
> सुशील त्‍या मुलीला भेटण्‍यासाठी शनिवारी रात्री ऐरोली परिसरात आला.
> मनसेच्‍या महिला कार्यकर्त्‍या अगोदरच तिथे दबा धरून बसल्‍या होत्‍या.
> तो येताच त्‍यांनी त्‍याला घेरले आणि बेदम मारहाण केली.
> एवढेच नाही तर त्‍याला निवस्‍त्र करून त्‍याची धिंड काढली आणि त्‍याला पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...