मुरबाडमध्‍ये सासरच्या छळास / मुरबाडमध्‍ये सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

May 17,2013 03:35:00 PM IST

मुरबाड - सासरच्या लोकांकडून पैशांसाठी वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार कर्जत तालुक्यातील खांडस गावाची गौरी भोईरची (20) मुरबाडच्या सदानंद शेळके याच्याशी मागील वर्षी लग्न झाले होते. शेळके कुटूंबीयांचा न्यायालयीन वाद सुरू होता. तो लढवण्‍यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी गौरीला माहेराकडून पन्नास हजार रूपये आणावे यासाठी तिचा पती, सासरा, सासू, नणंद यांच्याकडून सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. यास कंटाळून गौरीने आत्महत्या केली. तिच्या भावाने पोलिस ठाण्‍यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळींविरूध्‍द सदोष मनुष्‍यवधाचा व हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. पती सदानंद याला पोलिसांनी अटक केले असून इतर आरोपी फरारी आहेत. त्यांचा शोध चालू आहे.

X