ठाणे- विवाहितेवर बलात्कार / ठाणे- विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या दोघांना 20 वर्षे तुरुंगवास

May 20,2017 01:08:00 AM IST
ठाणे: शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर शस्त्राच्या धाकावर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विकास आव्हाड (२१) आणि गोपीचंद तिलोरे (२०) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात महिला घरी एकटी होती. ही संधी साधून दोघांनी तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, दुसऱ्या दिवशी महिलेने दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अटक केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा सुनावली.
X