Home | Maharashtra | Kokan | Thane | minister ganesh naik give order to diminish the encroachment

चौदा गावांतील अतिक्रमणे हटवण्याचे पालकमंत्री गणेश नाईकांचा आदेश

प्रतिनिधी | Update - May 27, 2013, 12:32 PM IST

नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली व आता कल्याण तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेली नारिवली, पिंपरी, वाळकण, नागावई आणि दहिसर ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी तक्रार केली होती.

  • minister ganesh naik give order to diminish the encroachment

    ठाणे- चौदा गावे हद्दीतील वनजमीन, गाळे इत्यादींवरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे तातडीने दूर करावीत, असे निर्देश ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. या आदेशामुळे गावांतील अनधिकृत बांधकामे करणा-यांचे धाबे दणाणले आहे.

    नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली व आता कल्याण तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेली नारिवली, पिंपरी, वाळकण, नागावई आणि दहिसर ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी तक्रार केली होती. त्‍यामुळे पालकमंत्र्यांनी अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेश दिले. या १४ गावांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांच्या जागेवर अवैध धंदे, चोरटे व्यवहार, दूषित केमिकल्स, भंगार जाळण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश नाईक यांनी अधिकार्‍यांना दिले आहे.

Trending