Home | Maharashtra | Kokan | Thane | Minor girl raped in Thane. Near chikhan nagar

ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 24, 2014, 12:56 PM IST

लग्नाचे आमिष दाखवून एका सतरा वर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. विकी रमेश भोईन (२२) असे आरोपीचे नाव आहे.

  • Minor girl raped in Thane. Near chikhan nagar
    ठाणे- लग्नाचे आमिष दाखवून एका सतरा वर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. विकी रमेश भोईन (२२) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही पडघा जिल्ह्यातील चिखनगर भागात राहत होती. काही महिन्यांपूर्वी मुलीची विकीशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा महिन्यांत अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. मुलीने सतत लग्नासाठी विचारणा करूनही त्याने तिला नकार दिल्याने अखेर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात विकीविरोधात तक्रार दाखल केली.
    पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्रेमभंगातून तरुणीची आत्महत्या...

  • Minor girl raped in Thane. Near chikhan nagar
    प्रेमभंगातून तरुणीची आत्महत्या
    प्रेमभंगातून एका वीस वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात रविवारी घडली. विद्या दारव्हे असे मृत तरुणीचे नाव आहे. विद्या ही बीएसीला होती. महाविद्यालयातील एका तरुणाशी तिची मैत्री होती. शनिवारी रात्री तिने तरुणाला मोबाईलवरून मॅसेज केला होता. मात्र, तरुणाने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने येथील नदीत उडी घेऊन जीवन संपवले.

Trending