आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंबिवलीत मनसेच्या मॅरेथॉनमध्ये धावले 900 ज्येष्ठ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर शाखेने आयोजित केलेल्या चौथ्या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास 900 ज्येष्‍ठांनी सहभाग नोंदविला. रविवारी फडके रोडवर ही स्पर्धा झाली.
डोंबिवलीत आप्पा दातार चौकात मनसेचे आमदार रमेश पाटील, ज्येष्‍ठ नगरसेवक शरदतात्या गंभीरराव, राजेश कदम आणि मालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी मीनाक्षी ओक यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
65 वर्षांच्या महिलांच्या गटात रतन सोमा यांनी प्रथम, पद्मजा दवडीकर द्वितीय तर उषा खेमानी यांनी तृतीय क्रमांक पटकविला. पुरुष गटात चंद्रकांत बिर्जे यांनी प्रथम, अनिल भिडे द्वितीय तर के.एस. भास्करन् तिसरे आले.

66 वर्षीय महिला गटात शीला राऊत, शौबिता पौल, शरयु काते यांनी अनुक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. याच वयोगटातील पुरुष गटात एकनाथ पाटील, श्रीराम पाटील आणि रामचंद्र मिस्त्री यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

72 वर्षीय महिला गटात सुमती पाटील प्रथम, जयश्री इनामदार द्वितीय तर सुवर्णा शहा तृतीय आल्या. याच वयोगटातील पुरुष गटात वामन शिंदे हे प्रथम, अप्पा पाध्ये द्वितीय तर गोंविंद बोंडे तृतीय क्रमांकांचे मानकरी ठरले.
विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.