आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP And Shetkar Kamgar Party Leader D.B.Patil Passed Away

खासदार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड- रायगडचे माजी खासदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनकर बाळू पाटील यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. उरणमधल्या साडेबारा टक्क्याच्या कायद्याचे जनक तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती. पाटील यांनी सातवेळा आमदार होते.
दि.बा.पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या गावात झाला होता. अत्यंत प्रतिकृल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते वकील झाले. त्यानंतर पनवेल नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. शेतकरी कामगार पक्षातील एकेकाळचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे पाटील नंतर शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर मात्र त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्विकारली होती.