आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशासाठी मित्राचा खुन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - पैशाच्या हव्यासापोटी महाविद्यालयीन तरुणांनी मित्राचं अपहरण करुन खून केल्याची घटना ठाण्यातल्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश श्रीराम असे आहे.
तारापूरचा रहिवासी असलेला हा तरुण कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये शिकत होता. काशिमीरा भागातल्या एका इमारतीत तो भाड्याने राहत होता. झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशानं गणेशचे मित्र रविंद्र य़ादव आणि कल्पेश सरोज यांनी गणेशच्या अपहरणाचा कट रचला. गणेशला नायगावला बोलावून त्याची दगडानं ठेचून हत्या केली. हत्येनंतर गणेशचा मृतदेह खाडीकिना-यावरील झुडपात फेकून देण्यात आला. यानंतर गणेशच्या वडिलांना आठ लाखांच्या खंडणीसाठी फोन केला.