ठाण्यातील नालासोपार्‍यात महिलेचे / ठाण्यातील नालासोपार्‍यात महिलेचे शिर आढळल्याने खळबळ

वृत्तसंस्था

Feb 21,2013 02:28:00 PM IST

ठाणे- ठाण्यातील नालासोपारा भागात महिलेचे कापलेले शिर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावराई पाडा परिसरात एका प्लास्टिकच्या पिशवीत हे शिर गुंडाळून फेकले. हे शिर असलेल्या महिलेचे वय साधारण 30 च्या जवळपास असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अज्ञात मारेकर्‍यांनी या महिलेचा शिरच्छेद करून तिची निर्घृण हत्या केली असावी. परंतु तिचे शिर फेकून त्यांनी संबंधित महिलेल्या धडाची कुठे विल्हेवाट लावली, हे शोधणे पोलिसांसमोरील एक आव्हानच आहे. अनैतिक संबंधावरून हे हत्याकांड झाले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहे.

X
COMMENT